YAVATMAL ZILHA AKHIL KUNBI SAMAJ's

GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)
NAAC Reaccredited Grade B++ CGPA 2.79 (3rdcycle) | | Affiliated to Sant Gadge Baba Amravati University

Department of Marathi & Marathi Literature
Events

Marathi Bhasha Gaurav Diwas मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम - शैक्षणिक वर्ष :- २०२०-२१ आणि २०२१-२२
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मराठी विभाग || अहवाल || विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा आणि साहित्यविषयक अभिरुची निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी मराठी विभागातर्फे अनेक उपक्रम व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी विभागातर्फे अनेक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून या विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने "मराठी भाषेचे महत्त्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या सहभागी स्पर्धकांमधून एम. कॉम. भाग २ ची विद्यार्थिनी क. पूनम बाबाराव खांडेकर हिचा प्रथम क्रमांक आला. कु. शिवानी राजाभाऊ महाजन एम. ए.भाग २ या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला. तर गणेश दत्ता विनकरे वर्ग १२ वा विज्ञान (अ) या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला. यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एम. कॉम. भाग ०२ ची विद्यार्थिनी आरती राजू कटके हिचा प्रथम क्रमांक आला. तर बी.एससी. भाग ०१ ची विद्यार्थिनी मयुरी शामराव दामोधर हिचा द्वितीय क्रमांक आला आणि वर्ग १२ वा कला (अ) मधील अक्षता विनोद पराते हिचा तृतीय क्रमांक आला. यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषा व साहित्याच्या अभ्यासावर आधारित ऑनलाईन "प्रश्नमंजुषा स्पर्धा" घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एम. ए. भाग २ चा विद्यार्थी अभिजीत दिलीपराव कदम आणि एम. ए. भाग २ चा विद्यार्थी पंकज सुभाष घुसे या दोन विद्यार्थ्यांनी (विभागून) पटकावला. शिवम कैलास कुंटे, एम. कॉम. भाग १, पवन प्रेमराव कदम, बी. ए. भाग १, ओम अरुण बोन्सले, बी. एससी. भाग २, साक्षी विनोद वानखेडे, १२ वा (अ), श्रद्धा भारत तुपेकर, संध्या संतोष कदम, बी. ए. भाग ३, अनिकेत किसनराव देशमुख, वर्ग १२ वा (अ) या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक (विभागून) आला. नेहा पांडुरंग भोकरे, वर्ग १२ वा, आदित्य सुरेश पुणेवार, विवेक गौतम धुळे, १२ वा, ऋतुजा सुधाकर कदम, १२ वा (ब), गायत्री मुकेश फाटे, बी. एससी. ०१ (जीवशास्त्र), श्रुती विजय रंधे, बी. एससी. भाग ३ (गणित), किरण माणिक मुरमुरे, एम. ए. भाग १, मराठी या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला. या सर्व यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठी विभागातर्फे दि. २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने " ऑनलाईन शिक्षण आणि विद्यार्थी" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राप्त झालेल्या निबंधांमधून मीनाक्षी किशोर बिचेवार एम. ए. मराठी भाग ०२ हिचा प्रथम क्रमांक आला. तर श्वेता दीपक ताकतोडे, बी.एससी. भाग ०१ या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. वैष्णवी राजाभाऊ महाजन, बी. कॉम. भाग ०२ हिने तृतीय क्रमांक मिळवला. तर पवन धोंडबाराव काळे बी.ए. भाग २ याला प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. या यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठी विभागातर्फे प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे (दि. २७ फेब्रुवारी) औचित्य साधून सोमवार, दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी "मराठी भाषा गौरव दिन" कार्यक्रम विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. तसेच वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने "कवी संमेलन व कविता वाचन स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले. मीनाक्षी किशोर बिचेवार, एम. ए. भाग २, मराठी या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला. ओम अरुण बोन्सले, बी.एससी. भाग २ या विद्यार्थ्याचा द्वितीय क्रमांक आला. तर कृष्णा भीमराव शेळके, एम.ए. भाग २, मराठी या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला. या यशस्वी स्पर्धकांना समारंभपूर्वक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मराठीतील साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. डॉ. एस
Notice Date :27-02-2022




News & Notice

Links & Downloads

   
Contact Us
GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)

07231-XXXXXX

principal@gsgcollege.edu.in

https://gsgcollege.edu.in

10:00 AM to 05:00 PM

VISITOR COUNT 40232

Locate Us
 
Designed & Developed bySoftFeat Technologies