YAVATMAL ZILHA AKHIL KUNBI SAMAJ's

GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)
NAAC Reaccredited Grade B++ CGPA 2.79 (3rdcycle) | | Affiliated to Sant Gadge Baba Amravati University

Department of Political Science
Events

Voters Day
सूचना वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 25 जानेवारी 2024 ला मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाद्वारे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पदवी स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 25 जानेवारी 2024 ला दिलेल्या वेळेत आणि लिंक वर क्लिक करून प्रश्नमंजुषा मध्ये सहभाग घ्यावा. स्पर्धेत 50 टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या ई-मेलवर ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल. परीक्षेची वेळ 25 जानेवारी दुपारी 3.00 ते 4.00 ही असेल. लिंक परीक्षेपूर्वी दहा मिनिट अगोदर देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घ्यावा. स्थळ - उमरखेड दि. 27/01/2024 समन्वयक डॉ व्ही एस इंगळे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्राचार्य
Notice Date :23-01-2024



Voters Day
अहवाल मतदार दिवसानिमित्त गो. सी. गावंडे महाविद्यालयात लोकशाहीचा जागर दि. 25 जानेवारी 2024 ला उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व राज्यशास्त्र विभाग गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्यात आले. गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात आयोजित 14 व्या मतदार दिवसानिमित्त मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही सुदृढ व बळकट करण्यास आपली भूमिका महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांनी केले. ते प्रमुख वक्ते म्हणून मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव बी कदम, प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड, नायब तहसीलदार श्री वैभव पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ पी वाय अनासने, सहकार्यक्रम अधिकारी प्रा ए पी मिटके, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख ले. एस एस पाचकुडडे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. 14 व्या मतदार दिवसानिमित्त सकाळी 9.00 वा महाविद्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून तहसीलदार श्री आनंद देऊळगावकर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात केली. दरम्यान गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तरुणांना मतदानाच्या बाबतीत जागृत करण्यासाठी पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. नंतर प्रांगणात मतदारासाठीच्या प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले. दु. 1.00 वा महाविद्यालयात डॉ आत्मारामजी गावंडे म्युझियम हॉलमध्ये कृषी महाविद्यालय कुपटी येथील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीच्या दृष्टीने नाटीकेचे सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमात उमरखेड तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तालुक्यातील उत्कृष्ट बीएलओ म्हणून सेवा केलेल्या शिक्षकांचे सुद्धा उपविभागीय अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी मतदार राजा जागृत असणे आवश्यक आहे. राजकीय सहभागीत्व वाढवून तरुणांची राजकारणातील सक्रियता देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामलौकिक मिळवून देईल असे मत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी व्यक्त केले. ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली असेल अशा विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करून मतदानाचे प्रमाण वाढविल्यास निष्पक्ष व जनताभिमुख सरकार सत्तारूढ होण्यास मदत होईल अशा प्रकारचे मत अध्यक्षीय समारोपादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ व्ही एस इंगळे यांनी केले. संचालन श्री रमेश विणकरे तर आभार प्रदर्शन डॉ पी वाय अनासने यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी तहसील कार्यालयाचे कर्मचारी व विविध विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. स्थळ - उमरखेड दि. 27/01/2024 समन्वयक डॉ व्ही एस इंगळे राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्राचार्य
Notice Date :27-01-2024



Meet to Local Self Govt – B. A. I Students
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड मधील राज्यशास्त्र विभागाद्वारा अनेक उपक्रम राबविले जातात. राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना राजकारण व शासकीय स्तरावरील, अधिकार व कर्तव्याचा पुस्तकी अभ्यास करण्याबरोबरच प्रत्यक्षात शासकीय संस्थांकडून कशा प्रकारचा कारभार स्थानिक पातळीवर केला जातो यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून स्थानिक स्वशासन संस्थांना भेटी देण्याचा अभिनव उपक्रम मार्च व एप्रिल 2023 या वेळेत बी ए भाग 1 च्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आला. उमरखेड परिसरातील ग्रामपंचायत व उमरखेड नगर परिषदेमध्ये राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी गटागटाने जाऊन तेथील शासकीय पदाधिकारी, कर्मचारी व राजकीय लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करून ग्रामीण पातळीवर नागरिक व स्थानिक शासन संस्थांच्या संबंधाबाबत होत असलेल्या सहकार्याबाबत, येणाऱ्या समस्या व अडचणींबाबत, शासकीय स्तरावरून होत असलेल्या मदतीबाबत सविस्तर चर्चा केली. स्थानिक स्वशासन संस्थांचा प्रत्यक्ष कशाप्रकारे कारभार चालतो हे जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली.
Notice Date :27-03-2023



Meet to Local Self Govt – B. A. I Students
सूचना - महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या बी ए भाग एक मधील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकी अभ्यासाबरोबरच स्थानिक स्वशासन संस्थांमधील कामकाजासंबंधी माहिती प्रत्यक्ष तेथील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडून समजून घेण्याकरिता मार्च व एप्रिल महिन्यामध्ये गटागटाणे आपापल्या परिसरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका अशा स्थानिक स्वशासन संस्थांना भेट देऊन तिथे चालत असलेले कामकाज समजून घ्यावयाचे आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी मार्च एप्रिल महिन्यामध्ये स्थानिक स्वशासन संस्थांना भेट देऊन त्यासंबंधीचा अहवाल राज्यशास्त्र विभागामध्ये एप्रिल महिन्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. दि 26/02/2023 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :27-03-2023



Gest Lect. :- Discuss on Budget of Maharashtra Government
अहवाल- राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व पदवी स्तरावरील एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून बाहेर पडावा या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या विविध पैलूंना वाव देण्यासाठी राज्यशास्त्र विभागाद्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात दि 3 एप्रिल 2023 ला गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. राज्यशास्त्र विषयाचे अध्ययन करीत असताना राज्याशी संबंधित राजकारण व शासनसंस्था तसेच त्यांच्याशी संबंधित अधिकाराचा अभ्यास केला जातो. अशावेळी कायदेमंडळाच्या अधिकाराचा अभ्यास करताना आर्थिक अधिकार विद्यार्थ्यांना शिकविला जातो. परंतु प्रत्यक्ष अंदाजपत्रक कशाप्रकारे चर्चेला घेतल्या जाते आणि अंदाजपत्रकामध्ये जमा व खर्चाचा तालमेळ कशाप्रकारे बसविला जातो तसेच राज्य सरकारकडून मांडण्यात आलेल्या अंदाजपत्रकाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्रा डॉ गणेश कदम यांनी विद्यार्थ्यांना अंदाजपत्रकातील महत्त्वपूर्ण बारकाव्यांची माहिती, जमाखर्चाचा ताळेबंद, तुटीचे अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक, संतुलित अंदाजपत्रक याबद्दल सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केले. सुरुवातीला अंदाजपत्रक यासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणे पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना किती महत्त्वपूर्ण आहे यासंबंधीचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ व्ही एस इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन हातमोडे यांनी केले यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Notice Date :03-04-2023



Gest Lect. :- Discuss on Budget of Maharashtra Government
सूचना - महाविद्यालयातील मानव विज्ञान शाखेतील राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की राज्यशास्त्र विभागाद्वारे महाराष्ट्र सरकारच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी व अंदाजपत्रकासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी दि 3 एप्रिल 2023 ला अर्थशास्त्र विषयाचे तज्ञ प्रा डॉ गणेश कदम यांचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे तरी राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी खोली क्रमांक एन 3 मध्ये दुपारी 1.00 वा उपस्थित राहावे दि 1 एप्रिल 2023 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :03-04-2023



Seminar - B.A. Students
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे राज्यशास्त्र विभागाद्वारा शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सत्रामध्ये बी ए भाग 1 व बी ए भाग 3 विद्यार्थ्यांसाठी दि. 23/03/2023 व दि. 2/04/2023 ला अभ्यासक्रमाशी संबंधित विषयांवर विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पसंतीच्या शीर्षकावर आधारित सेमिनार घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी या अनुषंगाने अतिशय अभ्यासपूर्ण आपली मते विद्यार्थ्यांसमोर मांडलेत साहजिकच त्यांची वक्तृत्व शैली, सभाधिटपणा व अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात वाढ होण्याबद्दल विषय शिक्षक म्हणून कोणत्याही प्रकारची शंका नाही. वरील प्रकारच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Notice Date :23-03-2022



Seminar B.A. Students
सूचना - महाविद्यालयातील मानव विज्ञान शाखेतील राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 23/03/2023 ला अभ्यासक्रमावर आधारित सेमिनार द्यावयाचे आहेत तरी विद्यार्थ्यांनी सेमिनार देण्याकरिता खोली क्रमांक एन 3 मध्ये उपस्थित राहावे दि 21/03/2023 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :23-03-2022



Seminar B.A.I, Group Disc B.A.III
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे राज्यशास्त्र विभागाद्वारा विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने सेमिनार व गटचर्चा यासारखे उपक्रम राबविले जातात. बी ए भाग 3 च्या विद्यार्थ्यांनी दि 28 नोव्हेंबर 2022 ला दुपारी 12.30 ते 1.20 वा या तासिकमध्ये भारतातील वाढता भ्रष्टाचार या विषयावर गटचर्चा घडवून आणली त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वरील विषयावर मनमोकळेपणाने चर्चा केली. बी ए भाग 1 च्या विद्यार्थ्यांनी दि 28 नोव्हेंबर 2022 ला दुपारी 1.20 ते 2.10 वा या तासिकमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित सेमिनार दिलेत. वरील उपक्रम संबंधित वर्गात पुरते मर्यादित होते. यावेळी राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित विषयाबद्दल काही बारकावे सुद्धा समजावून सांगितले. वरील उपक्रम राबविताना राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित नियोजन करून यशस्वीरित्या उपक्रम पूर्णत्वास नेले.
Notice Date :28-11-2022



Seminar B.A.I, Group Disc B.A.III
सूचना - महाविद्यालयातील बी ए भाग एक मधील राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 28/11/2022 ला अभ्यासक्रमावर आधारित सेमिनार द्यावयाचे आहेत तरी विद्यार्थ्यांनी सेमिनार देण्याकरिता खोली क्रमांक एन 3 मध्ये उपस्थित राहावे तसेच बी ए भाग तीन मधील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की भारतातील वाढता भ्रष्टाचार या विषयावर दि 18/11/2022 ला गटचर्चा घेण्यात येईल तरी सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित विषयावर अभ्यास करून यावे व गट चर्चेत सहभागी व्हावे दि 27/11/2022 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :28-11-2022



Constitution Day :- Reading Preamble, Poster Presentation, Quiz Competition
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड राज्यशास्त्र विभागाद्वारा दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो संविधान दिनाचे औचित्य साधून दि. 26 नोव्हेंबर 2022 ला महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम, प्रमुख अतिथी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस पाटील, न्यायमूर्ती शेख, उमरखेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संतोष आगलावे, सचिव ॲड वैभव डांगे, ॲड जितेंद्र पवार ॲड शिवाजी वानखेडे, प्रा अभय जोशी उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर अतिथींनी बी एस भाग 1, 2, 3 मधील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन झाल्याची औपचारिकता पूर्ण केली व संपूर्ण पोस्टरची पाहणी केल्यानंतर अतिथींनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उत्कृष्ट पोस्टरचे तोंड भरून कौतुक केले व त्यांना अशाच प्रकारच्या नवनवीन उपक्रमात सहभागी होऊन ज्ञानार्जन करण्याचा मोलाचा सल्ला न्यायमूर्ती पी एस पाटील यांनी दिला. यावेळी न्यायमूर्ती शेख साहेब व इतर अतिथींनी कायदा सुव्यवस्था रॅगिंग, वाहतुकीचे नियम व विद्यार्थी हिताच्या कायद्याची माहिती आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी संवैधानिक तरतुदीचा बारकाईने, सविस्तर अभ्यास करून हर घर संविधान पोहचविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पडल्यास संविधानाचे संरक्षण होण्यास मदत होईल असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम यांनी व्यक्त केले. यावेळी अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ, जिजामाता कला महाविद्यालय दारव्हा, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा आणि गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 755 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी केले संचालन मराठी विभाग प्रमुख अभय जोशी तर आभार प्रदर्शन कु. रश्मिका सुने यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करून कार्यक्रम पूर्णतः नेण्यासाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Notice Date :26-11-2022



Constitution Day :- Reading Preamble, Poster Presentation, Quiz Competition
सूचना - वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 26/11/2022 ला राज्यशास्त्र विभागाद्वारा संविधान दिन साजरा करण्यात येत आहे संविधान दिनानिमित्त डॉ आत्मारामजी गावंडे म्युझियम हॉलमध्ये पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले आहे तसेच संविधान दिनानिमित्त दिवाणी व फौजदारी न्यायालय उमरखेडच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी दुपारी 1.00 वाजता उपस्थित राहावे दि 23/11/2022 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :23-11-2022



Guest Lecturer - Fundamental Rights & College Students
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे राज्यशास्त्र विभागाद्वारा प्रा. ज्योती खंडारे राज्यशास्त्र विभाग प्रमुख मिलिंद महाविद्यालय मुळावा यांचे "मूलभूत अधिकार व महाविद्यालयीन विद्यार्थी" या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन दि 25 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले. सर्वप्रथम राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी अतिथी व्याख्यानाची रूपरेषा विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. प्रा ज्योती काळबांडे यांनी आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणाचे नवनवीन आयाम अवगत करीत असला तरी त्यांची मूलभूत हक्कांबद्दलची उदासीनता, अंमलबजावणी बाबत असलेले अज्ञान तरुणांच्या बेरोजगारीकडे वाटचाल करीत असल्याचे मत स्पष्ट केले. मूलभूत हक्काच्या जागृती शिवाय माणसासारखे जीवन जगणे अशक्य असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी आभार प्रदर्शन यश वटाणे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Notice Date :25-11-2022



Guest Lecturer - Fundamental Rights & College Students
सूचना - वरिष्ठ महाविद्यालयातील मानव विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 25/11/2022 ला राज्यशास्त्र विभागाद्वारे “मूलभूत अधिकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी अतिथी व्याख्यानाला खोली क्रमांक एन 3 मध्ये दुपारी 12.30 वा उपस्थित राहावे दि 23/11/2022 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :25-11-2022



Online Voter reg. Workshop - Display by Election Commission Maharashtra State
अहवाल - लोकशाहीची पायामुळे घट्ट व मजबूत करून लोकप्रिय सरकार निर्वाचित होण्यासाठी मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मतदारांमध्ये असलेली उदासीनता झटकून त्यांचेमध्ये नवचैतन्य निर्माण करता यावं म्हणून निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ज्यांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असेल अशा स्त्री-पुरुषांकडून स्वतःच ऑनलाईन प्रक्रियेद्वारा मतदार नोंदणी अर्ज भरता यावे, जनतेचे राजकीय सहभागीत्व वाढावे. याकरिता दि 18 नोव्हेंबर 2022 ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून आभासी पद्धतीने मतदार नोंदणी कशी केली जावी ह्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे थेट प्रसारण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये करून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व व मतदार नोंदणी विषयीची माहिती मिळावी व त्यांना आपल्या सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा वापर करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यशास्त्र विभागाद्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयातील डॉ आत्मारामजी गावंडे श्रोतुगृहात सर्व शाखेतील विद्यार्थ्यांकरीता थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्वप्रथम अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन का केले जाते यासंबंधीचे महत्व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केले. आभासी पद्धतीने होणारे थेट प्रक्षेपण पाहणे विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून संगणक विभागाचे डॉ एन डी जांभेकर यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या केले. Photos/Video clip Submitted:- https://youtu.be/q4KgE4YT86M (On Email Ingle@gsgcollege.edu.in 7/52023)
Notice Date :18-11-2022



Online Voter reg. Workshop - Display by Election Commission Maharashtra State
सूचना - वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 18/11/2022 ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारा आभासी पद्धतीने मतदार नोंदणी कशी करावी यासंबंधीच्या कार्यशाळाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे राज्यशास्त्र विभागाद्वारे या कार्यशाळाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था डॉ आत्मारामजी गावंडे म्युझियम हॉलमध्ये करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उपस्थित राहून मतदार नोंदणीची प्रक्रिया समजून घेऊन स्वतः व आपल्या परीसरातील मतदाराची मतदार नोंदणी करण्यास सहकार्य होईल दि 16/11/2022 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :18-11-2022



Guest Lecturer - Role of Governor in State Government
अहवाल - गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड राज्यशास्त्र विभागाद्वारा मानवविज्ञान शाखेतील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांकरिता अतिथी व्याख्यानाचे आयोजन दि. 16 नोव्हेंबर 2022 ला आयोजित करण्यात आले. "घटक राज्यातील राज्यपालाची भूमिका" या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे सदस्य डॉ पी एच सूर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातील राजकारणात शिवसेना - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना या प्रादेशिक राजकीय पक्षातून बाहेर पडून अस्तित्वात आलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबत युती करून स्थापन करण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकार व एकूणच त्यानंतरच्या राजकारणातील घडामोडी पाहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष राजकारणाचे ज्ञान अवगत व्हावे म्हणून वरील विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ रवींद्र कडू राज्यशास्त्र विभाग प्रमुख भारतीय महाविद्यालय मोर्शी व डॉ झोड विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवना यावेळी अतिथी व्याख्यानाला उपस्थित होते. अतिथी व्याख्यानाच्या सुरुवातीपूर्वी प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु दिपाली पुजदेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Notice Date :16-11-2022



Guest Lecturer - Role of Governor in State Government
सूचना - वरिष्ठ महाविद्यालयातील मानव विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 16/11/2022 ला राज्यशास्त्र विभागाद्वारे Role of Governor in State Government विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी अतिथी व्याख्यानाला खोली क्रमांक एन 3 मध्ये दुपारी 12.30 वा उपस्थित राहावे दि 14/11/2022 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :16-11-2022



Voters Awareness :- Graduation Voter Registration
अहवाल - सर्वसामान्य मतदारामध्ये जागृती करण्याबरोबरच सुशिक्षित मतदारामध्ये सुद्धा असलेली उदासीनता दूर करण्याच्या दृष्टीने विधानपरिषद पदवीधर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीकरिता पदवीधर मतदाराची नोंदणी करण्याकरिता राज्यशास्त्र विभागाद्वारा मतदार नोंदणी अभियान राबविल्या जाते. राज्यशास्त्र विभाग व मतदान जनजागृती मंच अंतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमे मार्फत महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या संपर्कातील अनेक पदवीधरांची मतदार नोंदणी करण्यासाठी उत्स्फूर्त सहकार्य केले. राबविण्यात आलेल्या या मतदार नोंदणी अभियानामध्ये एकूण 1530 पदवीधरांनी मतदार नोंदणी केली. संकलित केलेले सर्व 1530 पदवीधर मतदार नोंदणी अर्ज दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. तहसील कार्यालय उमरखेड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम, माजी कार्यकारी प्राचार्य डॉ. एस आर वद्राबादे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बी यु लाभसेटवार, संगणक विभागाचे डॉ नवीन जांभेकर, श्री नितीन कदम, श्री उद्दल राठोड, व नोडल ऑफिसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांचे उपस्थितीत तहसील कार्यालय निवडणूक विभागाचे प्रभारी नायब तहसीलदार श्री पवार साहेब यांच्याकडे सादर केले.
Notice Date :01-11-2022



Voters Awareness :- Graduation Voter Registration
सूचना - सर्व सहकारी प्राध्यापकांना सूचित करण्यात येते की विधान परिषदेतील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता पदवीधर मतदार नोंदणी सुरू आहे ज्यांचे पदवी घेऊन तीन वर्ष पूर्ण झालेले असतील अशा पदवीधरांचे मतदार नोंदणी फॉर्म दि 25/10/2022 पर्यंत राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ व्ही एस इंगळे यांच्याकडे भरून घ्यावेत जेणेकरून पदवीधर मतदार संघातील उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार मिळेल व लोकशाही बळकटी करण्याच्या कार्यात सहकार्य होईल दि. 6/9/22 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :01-11-2022



Guest Lecturer - Moral Values in Human Rights
अहवाल - राज्यशास्त्र विभागाद्वारा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी "मानवी हक्कातील नैतिक मूल्य" या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मानवविज्ञान, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ विजय गावंडे, श्रीमती सविताबाई देशमुख महाविद्यालय दिग्रस यांनी समाजामध्ये जीवन जगत असताना मानवी हक्क किती महत्त्वाचे आहे याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. मानवी हक्काला नैतिक मूल्याची जोड देताना विद्यार्थ्यांनी मानवी अधिकाराचा उपभोग कशा प्रकारचा करावा यासंबंधीची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम यांनी महाविद्यालयीन जीवनात मानवी हक्काचा रुबाब दाखवताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या नैतिक ऱ्हासाबद्दल नाराजी व्यक्त करताना विद्यार्थ्यांकडून बंधू भावाच्या वागणुकीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ के बी शिरसे, प्रा एस एस पाचकुडके, उपस्थित होते. अतिथी व्याख्यानाबद्दलचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ व्ही एस इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज घटमल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
Notice Date :27-09-2022



Guest Lecturer - Moral Values in Human Rights
सूचना - वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि 27/9/2022 ला राज्यशास्त्र विभागाद्वारे Moral Values in Human Rights विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी अतिथी व्याख्यानाला खोली क्रमांक एन 3 मध्ये दुपारी 2.00 वा उपस्थित राहावे दि. 25/9/22 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :27-09-2022



Bridge Course
Summary of Activity:- At the university level, the scope of courses taught in senior colleges is larger than that taught in junior colleges. The nature of the course in the junior college and the course in the senior college is different, in which case the role of bridge course is important to make a link between the two. The bridge course plays an important role in bridging the gaps left in Political Science in class 12th and the syllabus of BA Part 1. Although students have studied the political system of India in class 12th, it is important to take a bridge course to prepare them for the degree level course to give them room for improvement
Notice Date :05-08-2022



Bridge Course
सूचना वरिष्ठ महाविद्यालयातील बी ए भाग 1 मधील राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वा मधील राज्यशास्त्र विषय व वरिष्ठ महाविद्यालयातील बी ए भाग 1 मधील राज्यशास्त्र विषयांमध्ये अभ्यासक्रमाच्या दृष्टीने साधर्म्य साधण्यासाठी Bridge course चे आयोजन करण्यात येते तरी बी ए भाग 1 मधील राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी दि. 5/8/22 पासून आठ दिवसांच्या Bridge course ला दररोज नियमित खोली क्रमांक एन 3 मध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे दि. 02/08/22 राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचा;Z उमरखेड
Notice Date :05-08-2022



Guest Lecturer - Implementation of Human Rights & Indian Constitution
अहवाल गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागामार्फत डॉ सुनील चकवे मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा यांचे अतिथी व्याख्यान सोमवार दि 20 मार्च 2023 ला आयोजित करण्यात आले. सोमवार दि 20 मार्च 2023 ला आयोजित अतिथी व्याख्यानामध्ये मानवी हक्काचे अंमलबजावणी व भारतीय संविधान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम यांनी प्रमुख अतिथी डॉ सुनील चकवे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. त्यानंतर महाविद्यालयातील मानव्यविद्या, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींनी मानवी हक्काची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. प्रत्यक्ष जीवन जगतांना मानवी हक्काचा उपभोग घेत असता भारतीय संविधानाची भूमिका कशी महत्त्वपूर्ण आहे व व्यक्तींच्या विकासासाठी भारतीय संविधान एक जीवन पद्धती म्हणून सर्व सामान्य माणसाला उपयुक्त असलेला पवित्र ग्रंथ म्हणून काय भूमिका पार पाडतो यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांसमोर सविस्तरपणे केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Notice Date :20-03-2023



Guest Lecturer - Implementation of Human Rights & Indian Constitution
सूचना वरिष्ठ महाविद्यालयातील बी. ए., बी. कॉम., बी. एससी व बी.सी.ए. मधील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की महाविद्यालयात दि 20 मार्च 2023 रोजी "मानवी हक्काची अंमलबजावणी व भारतीय संविधान" या विषयावर डॉ सुनील चकवे, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा, यांचे अतिथी व्याख्यान दु. 2.00 वा. आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी दु. 2.00 वा. डॉ आत्मारामजी गावंडे म्युझियम हॉलमध्ये उपस्थित रहावे
Notice Date :20-03-2023



मतदार दिवस
Report - उपविभागीय कार्यालय उमरखेड तहसील कार्यालय उमरखेड व राज्यशास्त्र विभाग गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने 13 वा मतदार दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तहसील कार्यालयामधून सार्वजनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यानंतर तालुक्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच तालुक्यातील उत्कृष्ट BLO ला सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. व मतदार दिवसाचे महत्त्व उपविभागीय अधिकारी डॉ राठोड साहेब तहसीलदार आनंद देऊळगावकर साहेब नायब तहसीलदार पवार साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी कदम व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एस इंगळे यांचे उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
Notice Date :25-01-2023



मतदार दिवस
*सूचना* दि. 25 जानेवारी 2023 रोजी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व राज्यशास्त्र विभाग गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार दिवसा निमित्त उमरखेड शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी तहसील कार्यालय उमरखेड च्या प्रांगणात सकाळी 9.00 वा. उपस्थित राहावे
Notice Date :23-01-2023



परिक्षा पे चर्चा
गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड, जि. यवतमाळ शैक्षणिक वर्ष :  2022 23 मानव विज्ञान विद्या शाखा व वाणिज्य शाखा "परीक्षा पे चर्चा कार्यक्रम अहवाल" शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी २०२३ वेळ - सकाळी ११ ते ०२       आज शुक्रवार दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी केंद्रशासन,  राज्य शासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सूचनेनुसार "परीक्षा पे चर्चा" हा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनाच्यावतीने आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी दिली. आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास कला शाखेचे १२५ आणि वाणिज्य शाखेचे १०७ विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे, प्रा. डॉ. पी. डी. जाधव, प्रा. ए. एस. जोशी, प्रा.कु. नंदनवार, प्रा. कु. कळमकर यांनी परिश्रम घेतले. समन्वयक प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. इंगळे प्रा. डॉ. पी. डी. जाधव प्रा. ए. एस. जोशी
Notice Date :27-01-2023



परिक्षा पे चर्चा
दि.२७ जानेवारी २०२३ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन Notice Date :24-01-2023
Notice Date :24-01-2023




News & Notice

Links & Downloads

   
Contact Us
GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)

07231-XXXXXX

principal@gsgcollege.edu.in

https://gsgcollege.edu.in

10:00 AM to 05:00 PM

VISITOR COUNT 42101

Locate Us
 
Designed & Developed bySoftFeat Technologies